पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे – भोर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी वैभव भुतकर, उपाध्यक्षपदी माणिक पवार आणि कार्यकारी सदस्यपदी किरण भदे यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल नसरापूर ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच संजय गांधी निराधार योजना समितीच्या भोर तालुका सदस्यपदी इरफान मुलाणी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
नसरापूर ( ता. भोर ) येथील ग्रामपंचायतीमार्फत निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच रोहिणी शेटे, उपसरपंच गणेश दळवी, ग्रामसेवक विजयकुमार कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य संदीप कदम, नामदेव चव्हाण, सुधीर वाल्हेकर, सपना झोरे, उषा कदम, अश्विनी कांबळे, मेघा लष्कर, कर्मचारी रुपेश ओव्हाळ, तनुजा दळवी, पुनम सोंडकर, गणेश पानसरे, सायबु मुकणे, अक्षय सपकाळ, प्रमोद ठोंबरे उपस्थित होते.
उपसरपंच गणेश दळवी बोलताना म्हणाले की, नसरापूरमधील पत्रकार आपल्या लेखणीने समाजातील वंचित घटकांना न्याय देत असून सामाजिक आणि विधायक कार्यात कायम सक्रिय राहत असून त्याची निवड झाल्याने नसरापूर गावांसाठी अभिमानाची बाब आहे.
सत्काराला उत्तर देताना उपाध्यक्ष माणिक पवार यांनी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम देशमुख, जिल्हा पत्रकार संघ आणि भोर तालुका पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली निःपक्ष वार्तांकन करून विधायक कार्य करत असून कर्मभूमीमध्ये झालेला सन्मान हा आमच्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक विजयकुमार कुलकर्णी यांनी केले तर आभार सदस्या उषा कदम यांनी मानले.











