अस्मिता तांबे यांची पुणे महापालिकेत प्रतिनियुक्ती
संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी आज आशिष पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथील यापूर्वीच्या गटविकास अधिकारी अस्मिता तांबे यांची पुणे महापालिकेत सहायक आयुक्त म्हणून प्रतिनियुक्ती झाली असल्याने आज त्यांचा कार्यमुक्त करण्यात आले.
लोणार पंचायत समितीत आता आशिष पवार हे नवे गटविकास अधिकारी असतील. जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आजच पवार यांना नियुक्तीपत्र देत अस्मिता तांबे-धुमाळ यांना दुपारीच कार्यमुक्त केले. ग्रामविकास खात्याकडून आता त्या नगरविकास खात्याकडे प्रतिनियु्क्तीवर गेल्या आहेत.