• Contact us
  • About us
Tuesday, September 15, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजित पवार यांची भिलवडीत बोटीने नुकसानीची पाहणी, निवारा केंद्राबरोबरच सांगलीतील स्टेशन चौकास भेट

Maha News Live by Maha News Live
July 26, 2021
in यशोगाथा, सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, व्यक्ती विशेष, Featured
0

युवराज जाधव : महान्यूज लाईव्ह

आज सांगली दौऱ्यात अजित पवार यांनी भिलवडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. कवलापूर येथील निवारा केंद्राचीही पाहणी केली. त्याचबरोबर अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने भिलवडी येथे उपमुख्यमंत्र्यांनी बोटीतून नुकसानीची पाहणी केली.

भिलवडी (ता. पलूस, जि. सांगली) येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली आहे, पाणी भरलेल्या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोटीतून जाऊन पाहणी केली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आदी सहभागी होते.

भिलवडी (ता. पलूस, जि. सांगली) येथील पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पुरग्रस्तांना ठेवण्यात आलेल्या निवारा केंद्राला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पुरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. पुरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे ? याची त्यांच्याकडून माहिती घेतली.

भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा. वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. भिलवडी गावातील पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन देत संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरीकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सांगली शहरातील स्टेशन चौक परिसरालाही उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिली. स्टेशन चौक परिसरातील स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगली शहराला वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरुपी उपाय योजना राबविण्याबाबत चर्चा केली. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सांगलीच्या कवलापूर येथे पंडित नेहरू विद्यालय आणि दामाणी विद्यालय येथील पूरग्रस्त निवारा केंद्रांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. तेथील पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. वारंवार पुराने बाधित होणाऱ्या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Tags: Ajit PawarJayant PatilKolhapur Sangli FloodMaharashtra floodvijay wadettiwarVishwajeet Kadam
Next Post
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी अपशब्द वापरत जिल्हाधिकाऱ्यांना फैलावर घेतले…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी अपशब्द वापरत जिल्हाधिकाऱ्यांना फैलावर घेतले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group