मुंबई : महान्यूज लाईव्ह
कोकणातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी येथे कोणीही अधिकारी पाठवला नसल्याबद्दल मी तुम्हाला आजपर्यंत शांत बसू दिले, आता बसू देणार नाही, म्हणत सीएम, बीएम गेला उडत असे वक्तव्य केले. केंद्रीय मंत्र्याने राजशिष्टाचार पाळताना अशा भाषेचा वापर केल्याने अधिकारीही अवाक झाले.
मुख्यमंत्र्यांपाठोपाठ केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज चिपळूण दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी महापूराच्या नुकसानीची पाहणी केली. या दरम्यान राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि या ठिकाणी कोणीही अधिकारी पाठवला नसल्याबद्दल कडक शब्दात नाराजी व्यक्त केली.
त्यावेळी समोरून जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना तेथे पाठवले असल्याचे सांगताच कोण अॅडीशनल, बिडीशनल कलेक्टर येथे आलेले नाही.. मी आजवर शांत होतो, तुम्हालाही शांत बसू दिले, आता बसू देणार नाही असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरली.











