• Contact us
  • About us
Thursday, October 15, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

mahaanewslive by mahaanewslive
October 14, 2026
in यशोगाथा, सामाजिक, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

बारामती : महान्यूज लाईव्ह

बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत गोड पदार्थ प्रकारात डॉ. योगिता शिंदे-शेरखान यांनी, तर तिखट पदार्थ प्रकारात सोनाली नेवसे यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. सोमवारी आयोजित या स्पर्धेत महिलांनी उपवासाचे वैविध्यपूर्ण गोड आणि तिखट पदार्थ सादर करत आपल्या कल्पकतेची व पाककौशल्याची चुणूक दाखवली.

स्पर्धेच्या गोड पदार्थ बनविणे प्रकारात डॉ. योगिता शिंदे-शेरखान यांनी प्रथम, स्वाती महामुनी यांनी द्वितीय, सुषमा लोंढे यांनी तृतीय, तर वर्षा जाधव यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. तसेच छाया पाटील, भावना धर्माधिकारी व मानसी दुरुगकर यांनी अनुक्रमे पाचवा, सहावा व सातवा क्रमांक मिळवला. तर तिखट पदार्थ बनविणे स्पर्धेत सोनाली नेवसे यांनी प्रथम, सुप्रिया पाटील यांनी द्वितीय, धनश्री राऊत यांनी तृतीय, तर किरण जाधव यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला. दर्शना शहा, पुष्पावती भोसले आणि निकिता पानसांडे यांनी अनुक्रमे पाचवा, सहावा व सातवा क्रमांक पटकावला.

​नवरात्रोत्सवात बहुतांश महिलांचे उपवास असतात. त्यामुळे उपवासाचे चवदार व पौष्टिक गोड-तिखट पदार्थ बनवण्याची कला अवगत व्हावी, नोकरदार, व्यावसायिक व गृहिणींना पारंपरिक आणि नवनवीन पदार्थांची माहिती मिळावी तसेच महिलांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ लाभावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, असे जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी सांगितले. या स्पर्धेमुळे सादरीकरणाची उत्तम संधी मिळून आत्मविश्वास वाढल्याची भावना विजेत्या डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांनी व्यक्त केली. सुवर्णा जोशी व मोनिका आगवणे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा जयश्री सातव, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नामदेव तुपे, बारामती बँकेचे संचालक देवेंद्र शिर्के, डॉ. सुहासिनी सातव, विजया कदम, शारदा खराडे, सीमा चव्हाण, अंजली संगई आदींसह  जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण, मनीषा शिंदे, सुनंदा जगताप, संगीता साळुंखे, कल्पना माने, भारती शेळके, मनीषा खेडेकर, गौरी सावळे-पाटील, वंदना जाधव, सुवर्णा केसकर, ऋतुजा नलावडे, विणा यादव, पूजा खलाटे, अमृता सूर्यवंशी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी पाटील व संगीता साळुंखे यांनी केले, तर आभार मनीषा शिंदे यांनी मानले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group