• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा व पथदिव्यांचे कनेक्शन पूर्ववत करण्याचा निर्णय! सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या आंदोलनाला यश

Maha News Live by Maha News Live
July 20, 2021
in यशोगाथा, सामाजिक, मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, कामगार जगत, कोकण, राजकीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, व्यक्ती विशेष, Featured
0
ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा व पथदिव्यांचे कनेक्शन पूर्ववत करण्याचा निर्णय! सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या आंदोलनाला यश

अन्यायकारक निर्णय मागे घेण्याचे सरकारचे आश्वासन; परिषद पदाधिकारी व मंत्री मंडळाच्या बैठकीत सकारात्मक तोडगा

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह

राज्यातील बहुतेक ग्रामपंचायतींच्या पथदिवे व पाणीपुरवठा जोडांचे तोडण्यात आलेले कनेक्शन व ऐन कोरोनाच्या काळातील या निर्णयामुळे गावांवरील आलेले संकट आज सरपंच परीषदेच्या शिष्टाईमुळे दूर झाले. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने आज(दि.२०) मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उर्जामंत्री नितीन राऊत , सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटची तोडलेली कनेक्शन व पाणीपुरवठा कनेक्शन पुर्ववत जोडण्याचा निर्णय घेण्यात आला, तसे आदेश सबंधित विभागाला तात्काळ देण्यात आले.

यामुळे सरपंच परिषदेच्या राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला भरीव यश मिळाल्याचा दावा परीषदेच्या वतीने करण्यात आला. सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय काकडे, प्रदेश सरचिटणीस ऍड विकास जाधव, सातारा जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष नितीन पाटील सरपंच परिषदेचे विश्वस्त व सातारा कार्याध्यक्ष आनंदराव जाधव ,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोफळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय शेलार, सातारा जिल्हा उपाध्यक्ष अरुण कापसे, जिल्हा सचिव शत्रुघ्न धनवडे व इतरही पदाधिकाऱ्यांचे सरपंच परिषदेचे महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आज वरील मंत्र्यांना भेटले.

मागील काही महिन्यापासून महावितरणने राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सार्वजनीक स्ट्रीटलाईट व पाणी पुरवठा करणाऱ्या वीजपंपाचे कनेक्शन तोडले होते. यामुळे सरपंच परिषद राज्यात आक्रमक झाली होती. सरपंच परिषदेने राज्यात निदर्शने सुरू केली होती. तसेच या निर्णयामुळे भर पावसाच्या दिवसात अनेक ग्रामपंचायती अंधारात व लाखो नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. यामुळे राज्य शासनावर नागरिकांचाही रोष वाढू लागला होता.

मंत्री महोदयांच्या निर्णयांचे स्वागत , दत्ता काकडे,प्रदेश अध्यक्ष, सरपंच परिषद : सरपंच परिषद मुंबई,महाराष्ट्राच्या शिष्टमंडळा बाबत सबंधित विभागाने सकारात्मक चर्चा व निर्णय घेऊन सर्व तोडलेले कनेक्शन पुर्ववत करण्याचे आदेश दिल्या बद्दल सरपंच परिषद सर्वांचे मनपुर्वक आभार मानत आहे.तसेच सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळात सहभागी असलेले सरपंच परिषद मुंबई सातारा जिल्हा अध्यक्ष नितीन पाटील व त्यांच्या टीम मधील सर्व पदाधिकारी वर्गांचे देखील कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

हा तर सरपंचाच्या एकजुटीचा विजय; अॅड.विकास जाधव, प्रदेश सरचिटणीस, सरपंच परिषद : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ, उर्जा विभागाचे मंत्री नितीन राऊत, सहकार विभागाचे मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळा सोबत सकारात्मक चर्चा व घेतलेले निर्णय आणि दिलेले आदेश म्हणजे राज्यातील सरपंच वर्गाच्या एकजुटीचा व सरपंच परिषदेच्या आंदोलनाचा विजय आहे.

राज्य शासनाने सहकार्याची भुमिका घेतली : नितीन पाटील, जिल्हाध्यक्ष, सरपंच परिषद,सातारा. सर्व मंत्री महोदयांनी सरपंच परिषदेच्या मागण्या व ग्रामपंचायतीच्या अडचणी ऐकून दिलेले आदेश महत्वपुर्ण आहेत. यामुळे पुन्हा अनेक गावात वीज पुर्ववत होऊन मोठी समस्या मिटणार आहे.तसेच या पुढे देखील राज्य सरकार सरपंच परिषद व सरपंचाच्या हितासाठी कटीबद्ध व सकारात्मक असे आश्वासन दिले आहे.

Next Post
१५ जून पासून राज्यात शाळा सुरू होणार!

बिग ब्रेकींग : स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येनंतर सरकार खडबडून जागे! राज्यातील रखडलेली ४० हजार शिक्षकांची भरती सुरू; पहिल्या टप्प्यात होणार ६ हजार शिक्षकांची भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group