मुंबई : महान्यूज लाईव्ह
लोक अनेकदा रेल्वे स्टेशन अथवा रेल्वे लाईन क्रॉस करण्याची घाई तरुणांकडून होत असते आणि अनेकदा अशा परिस्थितीत जीव गमवावा लागतो. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, तरीदेखील लोक घाई करतातच, मात्र आज कल्याण रेल्वे स्थानकावर एका मोठ्या अनर्थापासून रेल्वेचालकाने वाचवले. रेल्वेचालकाच्या प्रसंगावधाने परिसरात कौतुक होत असून रेल्वेचालकाने रेल्वे क्रॉस करताना एका आजोबांना वाचवले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
याचा व्हिडीओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता..
आज कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे लाईन क्रॉस करताना एक वयोवध्द व्यक्ती मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या रेल्वेच्या इंजिनखाली आले. अचानक घडत असलेला हा प्रकार पाहून रेल्वेचालक एस.के. प्रधान व एल.पी. रवीशंकर अचानक आपत्कालीन ब्रेक दाबून अथक प्रयत्न करून युध्दपातळीवर गाडी थांबवली. त्यानंतर रेल्वे चालक व लोको पायलटने त्यांना बाहेर काढले. या घटनेमुळे स्थानक परिसरात खळबळ उडाली होती. मात्र या ज्येष्ठ व्यक्तीचे प्राण वाचल्याचा आनंद सर्वांनाच झाला. अर्थात यानंतर तरी किमान रेल्वे स्थानक अथवा इतर कोठेही धोकादायकरित्या रेल्वे लाईन क्रॉस करू नये अशी अपेक्षा या चालकांनी व्यक्त केली. सध्या याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय.










