खंडाळा : महान्यूज लाईव्ह
13 जुलै 2021 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील माजलगाव येथील रस्त्यावर दुचाकी रस्त्यामध्ये जबरदस्तीने थांबवून मारहाण करून मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यास लुटले होते. ती टोळी बोरगाव पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी 24 तासात जेरबंद केले.
यासंदर्भात सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांनी दिलेली माहिती अशी, 13 जुलै रोजी उंब्रज (ता. कराड) येथील राहणारे व सातारा येथील मायक्रो फायनान्स कंपनीत काम करणारे गणेश वैजनाथ राख हे महिला बचत गटांकडून कर्जाचे हप्ते गोळा करून अंधारवाडी खराडे माजगाव या ठिकाणाहून निघाले होते.
माजगाव च्या हद्दीत तीन जणांनी त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाची बॅग हिसकावून उसाच्या शेतात पळून गेले. या दरम्यान या तिघांनी राख यांना हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. यामध्ये जमा केलेली रक्कम व पाच हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा टॅब असा 51 हजार 573 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला होता.
त्यावरून राख यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही बाब लक्षात घेत पोलीस सहायक निरीक्षक डॉक्टर सागर वाघ यांनी पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलिस अधिक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून फौजदार वर्षा डाळिंबकर, हवालदार नितीन महाडिक, किरण निकम, विजय साळुंखे, विशाल जाधव, प्रकाश वाघ, राहुल भोये, कपिल टिकोळे, अमित पवार, उत्तम गायकवाड, यांच्या पथकामार्फत तपास सुरू केला.
यामध्ये तांत्रिक बाबींचा अभ्यास करून गुन्हेगारांचा माग शोधण्यात आला. यामध्ये गुन्ह्यात वापरलेली दुचाकीची माहिती मिळाली. त्याआधारे चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 45 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास बोरगाव पोलिस करत आहेत











