मुंबई : महान्यूज लाईव्ह
आज दिल्लीत नव्या १७ ते २२ जणांना मंत्रीपद दिले जाणार आहे. अर्थातच त्यात महाराष्ट्राचा क्रमांक पहिल्यांदाच वरचा ठेवला असून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पहिला नंबर दिला आहे.. मात्र त्यापूर्वी मोदी यांच्या १२ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
या मंत्र्यांमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, शिक्षणमंत्री रमेश निशंक, संतोष गंगवार, देबोश्री चौधरी, महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांचा समावेश असून यामध्ये रावसाहेब दानवे व संजय धोत्रे यांचा समावेस आहे. याखेरीज पश्चिम बंगालमधील बाबुल सुप्रियो, कर्नाटकातून सदानंद गौडा या मंत्र्यांचा समावेश आहे. यातील काही जणांना नवे खाते दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र हा महिना बाराच्या भावाचाच जणू असल्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. म्हणजे पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या बहुमताच्या जोरावर भाजपचे गोंधळ घालणारे १२ आमदार निलंबित करण्यात आले. दुसरीकडे राज्यपालांनी महाविकास आघाडीचे १२ राज्यपालनियुक्त आमदार अडकवून ठेवले आहेत.
आज केंद्रीय मंत्रीमंडळात महाराष्ट्रातून ४ जणांचा नव्याने शपथविधी होणार आहे. अर्थात राज्यातील दोन जणांना घरी जावे लागले आहे. त्यामुळे नव्याने केवळ दोनच जणांना संधी मिळणार आहे असे दिसत आहे.