इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे कार्य उल्लेखनीय असून सहकारी संस्थेच्या माध्यमातून ते कार्य उंचावण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्नशील राहावे,असे आवाहन माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले.
इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी ज्ञानदेव चव्हाण यांची नुकतीच निवड झाली. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी ज्ञानदेव चव्हाण यांचा सत्कार करून अभिनंदन केले.यावेळी पाटील बोलत होते.
यावेळी माजी चेअरमन सुनील वाघ, व्हाईस चेअरमन वसंत फलफले, ज्ञानदेव बागल, हरीश काळेल, नितीन वाघमोडे, किरण म्हेत्रे, विलास शिंदे, हनुमंत दराडे, सुभाष भिटे, सुनील चव्हाण, गणेश सोलनकर, सुरेश माने, संभाजी काळे, सिद्धार्थ चव्हाण, सचिव संजय लोहार उपस्थित होते.