नगर : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सावतामाळी महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर यांना नुकतीच एक चार चाकी गाडी भेट दिली आहे. आमदार रोहित पवार यांनी रमेश महाराज वसेकर यांना दिलेल्या या गाडीची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा होते आहे.
आमदार रोहित पवार यांचे कुटुंबीयांचे आणि माढा तालुक्यातील अरण या गावाचे एक भावनिक व जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यातच ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार हे नेहमी या गावातील शेतकऱ्यांच्या व या गावातील शेतकरी राजेंद्र पवार यांच्या संपर्कात कायम असतात. या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराजांची समाधी असल्याने रोहित पवार देखील अधून मधून या समाधीला भेट देतात.
मध्यंतरी रोहित पवार यांनी अरण येथे भेट दिल्यानंतर रमेश महाराज वसेकर यांची भेट घेतली होती. तेव्हा संत शिरोमणी सावता महाराजांच्या विचार आणि कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी वसेकर हे राज्यभर प्रवास करतात. त्यांच्याकडे सध्या असलेल्या गाडीतून ते मोठ्या प्रमाणावर फिरू शकत नाहीत. याची कल्पना रोहित पवार यांना आली आणि रोहित पवार यांनी त्यांना एक चार चाकी गाडी भेट दिली.