इंदापूर : महान्यूज लाईव्ह
वंचित बहुजन आघाडी च्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी सागर गायकवाड यांची निवड करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुक्याची कार्यकारणी निवड करण्यात आली. ही बैठक इंदापूर येथील शासकीय विश्रामधाम येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी हनुमंत कांबळे होते.
निवडण्यात आलेली कार्यकारणी पुढीलप्रमाणे: इंदापूर तालुकाध्यक्ष सागर गायकवाड, उपाध्यक्ष हनुमंत बनसोडे, अनोज गायकवाड, बोधीराज चव्हाण, महासचिव अमोल भोसले, शरद पवार, कोषाध्यक्ष राजेंद्र बंडगर, संघटक पंकज बनसोडे, तसेच इंदापूर शहाराध्यक्ष अविनाश मखरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद चव्हाण यांनी केले. बैठकीस प्रसाद लोखंडे, पवन पवार, राहुल सोनवणे, सागर लोंढे, ॲड.चंदनशिवे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.