चंद्रपूर : महान्यूज लाईव्ह
गेल्या कित्येक वर्षापासून नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले सुरुंग गावठी बॉम्ब हत्यारे ही शोधण्यात पोलिसांचा वेळ गेला. हे शोधण्यावर पोलिसांची अभियानाची पद्धत राहिली, पण गडचिरोलीच्या c-60 पोलिसांना पथकाला पहिल्यांदाच नक्षलवाद्यांनी जंगलात पेरून ठेवलेले सोळा लाख रुपये आणि नक्षली साहित्य सापडले.
नक्षलवाद्यांनी जमिनीमध्ये 15 लाख 96 हजार रुपये लपवून ठेवले होते. ही सर्व रक्कम दोन हजार रुपयांच्या नोटा मध्ये होती याखेरीज सुरुंगाचे वायर्स, वॉकीटॉकी या ठिकाणी सापडले. यावेळी पोलिसांनी इलेक्ट्रिक बटन, वॉकीटॉकी, नक्षलवाद्यांचे बॅनर्स या ठिकाणावरून जमा केले.
नक्षलवादी त्यांच्या नक्षली कारवायासाठी विविध प्रकारच्या ठेकेदार, व्यवसायिक यांच्याकडून खंडणी वसूल करतात. यामधूनच जमा झालेले पैसे एटापल्ली तालुक्यातील हालेवारा परिसरातील जंगलात लपवून ठेवले होते.