मुंबई : महान्यूज लाईव्ह
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या गुप्तचर विभागाने उरण येथील (जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट) जेएनपीटी बंदरामधून तब्बल 290 किलो हेरॉईन जप्त केले. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल तीनशे कोटी रुपये आहे.
या वर्षातील सहा महिन्यातील ही सर्वात मोठी कारवाई असून. यासंदर्भात एएनआईने दिलेल्या माहितीनुसार कस्टम विभागाने हे प्रकरण डी आर आय कडे सोपवले आहे. आज पकडण्यात आलेले हेरॉईन मागील दोन वर्षातील पकडण्यात आलेल्या अंमली पदार्थांमधील सर्वाधिक आहे. आता याचा पुढील तपास महसूल गुप्तचर संचालनालय करत असून 290 किलो हेरॉईन प्रकरणी दोन संशयितांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.