अॅड.विजय सोनवणे, नगर
विनापरवाना सावकारकी व्यवसाय करणाऱ्यांवर कर्जत पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने अवैध सावकारकी करणारांचे धाबे दणाणले आहेत. सावकारांच्या जाचाला न कंटाळता बिनधास्तपणे पुढे येऊन तक्रार द्या असे अवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नागरिकांना केले. त्यामुळे अशी अनेक प्रकरणे आता समोर येत आहेत. यादव यांच्या खमक्या कारवाईच्या भीतीने लाखो रुपयांच्या परस्पर तडजोडी केल्या जात आहेत. आता तालुक्यातील अशीच चौथी घटना समोर आली आहे.
त्याचे झाले असे, सचिन विलास पाटील (रा.काळेवाडी) यांनी एक वर्षांपूर्वी परीटवाडी येथील एका सावकाराकडून व्यावसायाकरता ६ लाख रुपये तेही ५ रु. टक्के व्याजाने घेतले होते. त्या रकमेवर वेळेवर व्याजही दिले. मात्र मुळ रकमेची परतफेड न झाल्याने ती रक्कम आत्ताच पाहिजे असा तगादा सावकाराने लावला.
एवढ्यावरच न थांबता तक्रारदाराच्या मालकीची सुमारे १५ लाख किमतीची फॉर्च्युनर ही चारचाकी (एम.एच.१२ के.डब्लू००२५) काही महिन्यांपूर्वी बळजबरीने ओढून नेली. त्यानंतर मात्र आता माझी मानसिकता बिघडली अशी भावना व्यक्त करत तक्रारदारांनी यादव यांच्याकडे कैफियत मांडली.
यादव यांनी तक्रारीची दखल घेत राशीन पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे, सागर म्हेत्रे, संपत शिंदे यांना हकीकत सांगून तात्काळ संबंधित सावकारास कर्जत पोलीस ठाण्यात हजर करण्याचे तोंडी आदेश दिले.
सावकार हजरच झाला नाही, तर मी गाडी तात्काळ परत करतो असे सांगत त्याने लागलीच गाडी परतही केली. चंद्रशेखर यादव यांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे अनेक गोरगरीब कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचली आहेत. त्यामुळे यादव व त्यांच्या सर्व टिमचे जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे.
सावकाराने व्याजाच्या पैशात बळजबरीने फॉर्च्युनर ओढून नेली… तक्रारदाराने नुसती तोंडी तक्रार केली…मग काय?चंद्रशेखर यादवांनी थेट गाडीच ताब्यात दिली!
अॅड.विजय सोनवणे, नगर विनापरवाना सावकारकीचा व्यवसाय करणाऱ्यांवर कर्जत पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने अवैध सावकारकी करणारांचे धाबे दणाणले आहेत.सावकारांच्या जाचाला न कंटाळता बिनधास्तपणे पुढे येऊन तक्रार द्या असे अवाहनच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नागरिकांना केलेले आहे. त्यामुळे अशी अनेक प्रकरणे आता समोर येत आहेत.यादव यांच्या खमक्या कारवाईच्या भीतीने लाखो रुपयांच्या परस्पर तडजोडी केल्या जात आहेत.आता तालुक्यातील अशीच चौथी घटना समोर आली आहे.त्याचे झाले असे, सचिन विलास पाटील (रा.काळेवाडी) यांनी एक वर्षांपूर्वी परीटवाडी येथील एका सावकाराकडून व्यावसायाकरता कामाकरिता दोघांनी प्रत्येकी ६ लाख रुपये तेही५ रु. टक्के व्याजाने घेतले होते.त्या रकमेवर वेळेवर व्याजही दिले.मात्र मुळ रकमेची परतफेड न झाल्याने ती रक्कम आत्ताच पाहिजे असा तगादा लावला आणि तक्रारदाराच्या मालकीची सुमारे १५ लाख किमतीची फॉर्च्युनर ही चारचाकी (एम.एच.१२ के.डब्लू००२५) काही महिन्यांपूर्वी बळजबरीने ओढून नेली होती.त्यामुळे आता माझी मानसिकता बिघडली आहे अशी भावना व्यक्त करत यादव यांच्याकडे कैफियत मांडली.यादव यांनी तक्रारीची दखल घेत राशीन पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ ,पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते,पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे,सागर म्हेत्रे,संपत शिंदे यांना हकीकत सांगून तात्काळ संबंधित सावकारास कर्जत पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्याचे तोंडी आदेश दिले. सावकार हजर होताच मी गाडी तात्काळ परत करतो असे सांगितले आणि लागलीच गाडी परतही केली.चंद्रशेखर यादव यांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे अनेक गोरगरीब कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचत आहेत. त्यामुळे यादव व त्यांच्या सर्व टिमचे जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे.