ऑल इंडीया पॅथर सेनेच्या मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा पाठीबा
संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार : राज्यातील अनुसुचित जाती व जमाती वर होत असलेल्या अन्याय अत्याचार सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचा भोंगळ कारभार,पदोन्नती आरक्षण, विदयार्थ्याच्या समस्या व अन्य मागण्यासाठी ऑल इंडीया पॅथर सेनाच्या वतीने तहसिलदार यांना देण्यात आले.
डरकाळी आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनास लोणार वंचित बहुजन आघाडीने सुध्दा पाठीबा दिला व या आंदोलनामध्ये सहभागी झाले. राज्यातील अनुसुचित जाती व जमातीवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध विविध मागण्यासाठी ऑल इंडीया पॅथर सेनाच्या वतीने डरकाळी आंदोलन छेडण्यात आले होते.
यावेळी पॅथर सेनेचे तालुका अध्यक्ष अमित काकडे यांच्या नेतृत्वात व वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते संघपाल पनाड यांच्या मागदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यामध्ये प्रामुख्याने राज्यात वाढते जातीय अन्याय- अत्याचार, अनुसुचित जातीच्या विदयार्थ्याची सामाजिक न्याय विभाग समाज कल्याण, बार्टी तर्फे हेाणारी विदयार्थ्याची गळचेपी, महाज्योतीचा 125 कोटीचा निधी विनावापर परत गेला.
मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण, मुस्लीम आरक्षण, राज्यातील तासिका तत्वावरील तसेच कंत्राटी पध्दत ही वेठबिगारी, तसेच आरक्षण विरोधी पध्दत असुन ही तात्काळ बंद करून कायमस्वरूपी प्राध्यापकांची, अधिव्याख्यातांची भरती आरक्षणानुसार व्हावी, राज्यातील ऐतीहासिक बौध्द लेण्यावर काही संमाजकंटकाकडुन धार्मिक, सांस्कृतीक अतिक्रमणा होत असुन याबाबत ठोस कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाच्या मागण्या करण्यात आल्या.
सर्व बोध्द लेण्याचे संवर्धन व सरंक्षण व्हावे राज्य पुरातत्व विभागाचे याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत आहे. या मागण्यासाठीही हे आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी तहसिलदार विजय पिंपरकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ऑल इंडीया पॅथर सेना तालुकाध्यक्ष अमित काकडे, वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते संघपाल पनाड , श्रावण मोरे, अनंथा मोरे , अजय मोरे, तुषार अंभारे, सागर वाढवे, विजय वाढवे, सुनिल मोरे, मिलींद अंभारे, विकास मोरे, दिपक कहाळे, शुभम अवसरमोल, सांगर अंभोरे , सर्जेराव मोरे, राम गायकवाड, जिवन अंभोरे, प्रेम सरदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.