संदीप मापारी पाटील, बुलढाणा
बुलढाणा पोलिसांनी जुगारावर कारवाईचा धडाका कायम ठेवला असून, चौथ्या दिवशी देखील पोलिसांनी कारवाई केली. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत, बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री गीते यांच्या पथकाने मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कनका गावात एका शिवारामध्ये जुगार खेळत असलेल्यांना ताब्यात घेतले.
यावेळी फौजदार निलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, लक्ष्मण कटक, गजानन गोरले, संभाजी असोलकर, विजय मुंढे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत 1) गुलाब मेरचांद राठोड, रा. कनका, 2) शेख वजीर शेख जलाल, रा. गोहगाव, 3) शेख वसीम शेख अकबर रा. डोंनगाव, 4) राजू रायभान साळवे, रा. गोहगाव, 5) शेख सिद्दिक शेख बशीर रा डोंनगाव, 6) तोसिफ शहा इकबाल शहा रा. डोंनगाव, 7) संजय निवृत्ती जमदाडे रा. डोंनगाव यांना पोलिसांनी जुगार खेळताना पकडले.
जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत सत्तावीस हजार तीनशे रुपयांची रोख रक्कम चार लाख 70 हजार रुपयांच्या किमतीच्या दहा दुचाकी 33 हजार रुपये किमतीचे 9 मोबाईल व जुगाराचे साहित्य असा पाच लाख तीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पुढील तपास डोणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस करत आहेत