विशाल कदम:- महान्यूज लाईव्ह
लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील गणेश महादेव जेटीथोर यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) हवेली तालुका युवक उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
कदमवाकवस्ती येथे गुरुवारी (ता. १) पार पडलेल्या कार्यक्रमात गणेश जेटीथोर यांना आरपीआयचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी आरपीआय चे युवा जिल्हाध्यक्ष गजेंद्र मोरे, तालुकाध्यक्ष मारुती कांबळे, नवनाथ कांबळे, शकील शेख, सागर कुंडेकर, गोविंद राठोड, आतिष चव्हाण, राहुल दिलपाक, विजय चौगुले, राजू साखरे, बाळासाहेब गोरसे, रमेश गायकवाड आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर बोलताना गणेश जेटीथोर यांनी सांगितले आहे.