माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जन्म दिनानिमित्त नसरापूर कृषी विभाग आणि नसरापूर महसूल विभागाच्या वतीने परिसरातील प्रगतशील शेतकरी, कृषीकन्या तसेच डॉक्टर यांचा सन्मान करून आगळावेगळा कृषी दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आमच्या मातीत झालेला सत्कार हा लाखमोलाचा असल्याची भावना व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले आहे.
नसरापूर ( ता. भोर ) येथील जानकीराम मंगल कार्यालयात कृषीदिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रगतशील शेतकरी श्यामसुंदर जायगुडे, कृष्णा फडतरे, दत्तात्रय वाल्हेकर, राजेंद्र कोंडे, ज्ञानेश्र्वर झोरे, कुंडलिक मोरे, विजय शिळीमकर, कृषीकन्या वर्षा गायकवाड, आरोग्य विभागाचे गोबे यांचा उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नसरापूर मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, वेळूच्या मंडलाधिकारी विद्या गायकवाड, नसरापूर कृषी विभागाचे पर्यवेक्षक विजय शिशुपाल, कृषी सहायक अधिकारी अमर चव्हाण, सरपंच रोहिणी शेटे, उपसरपंच गणेश दळवी, तलाठी जे. डी. बरकडे, ग्रामसेवक विजयकुमार कुलकर्णी, सदस्य संदीप कदम, सुधीर वाल्हेकर, नामदेव चव्हाण, माळेगांवचे उपसरपंच विकास निगडे, काका शिळीमकर आदी उपस्थित होते.
शेतकरी श्यामसुंदर जायगुडे यांनी सांगितले की, महसूल आणि कृषी विभागाचे धन्यवाद मानत उत्पादनासाठी देश या राज्यावर निर्भर आहे, तरी सुद्धा राज्याच्या अन्नदात्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कमी पाऊस, वाढती महागाई, पिकांचे नुकसान अशा सर्व गोष्टींचा सामना करावा लागत आहे.
कृषी पर्यवेक्षक विजय शिशुपाल यांनी कृषी विषयक योजनाची सविस्तर माहिती यांनी दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली यांनी केले तर शेतकऱ्यांच्या कार्याची माहिती पत्रकार किरण भदे दिली. सूत्रसंचालन पत्रकार माणिक पवार यांनी केले. वेळूच्या मंडलाधिकारी विद्या गायकवाड यांनी आभार मानले.