दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : चार्टर्ड अकौंटंटची परीक्षा खूपच अवघड असते. त्यात कर्तृत्ववान, जिद्दी व प्रामाणिकपणे अभ्यास करणारेच यशस्वी होत असतात. यशस्वी होण्याचे प्रमाणही खूपच अत्यल्प असते. ओझर्डे गावात माझ्यासह तीन चार्टर्ड अकौंटंट झाले असून हा आमच्या गावाचा अभिमान आहे. सीए चेतन संजय कोदे हा सुध्दा हुशार मुलगा असून तो या व्यवसायात चांगले नाव कमवेल, असा मला विश्वास आहे, असे उद्गार वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष व चार्टर्ड अकौंटंट चंद्रकांत काळे यांनी काढले.
ओझर्डे येथील किराणा व भुसार मालाचे व्यापारी संजय कोदे यांचा मुलगा सीए चेतन कोदे यांनी वाई बाजार समितीच्या जागेत सुरू केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी सी. व्ही. काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक नितीन पाटील होते.
पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व सी. व्ही. काळे यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
वाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी कोदे यांना शुभेच्छा देऊन आपला व्यवसाय प्रामाणिकपणे विश्वासाने सर्व सामान्यांना न्याय देत योग्य फी घेत करावा असे सांगितले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ. संगीता चव्हाण, उपसभापती विक्रांत डोंगरे, सदस्य मधुकर भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पिसाळ-देशमुख, शशिकांत पवार, यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रताप यादव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ, विश्वजीत पिसाळ, अविनाश फरांदे, भास्कर निकम, पृथ्वीराज पिसाळ, सरपंच आनंदा जाधव, उपसरपंच केशव पिसाळ, दत्ता मर्ढेकर, दौलत पिसाळ, राजू निकम, भगवान धुमाळ, सुशांत कामटे, चंद्रकांत कदम, डॉ. विकास पिसाळ, शंकर फरांदे आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
सीए चेतन कोदे यांनी प्रास्ताविक केले. सागर फाटक यांनी सूत्रसंचालन केले. संजय कोदे, दिपक कोदे, केतन कोदे यांनी स्वागत केले. भाऊसाहेब कदम यांनी आभार मानले.