इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव समिती भिगवण (ता. इंदापूर) यांच्या वतीने करण्यात आले.सर्व स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जीवन चरित्र, सामाजिक कार्य, शासन व प्रशासन कौशल्य या विषयावर ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे हे पहिले वर्ष असून राज्यभरातून या स्पर्धेत स्पर्धक सहभागी झाले होते.
स्पर्धेचे विजेते खालील प्रमाणे खुला गट – श्रावणी राजेंद्र पवार, आदर्श विद्या मंदिर भिगवण (प्रथम क्रमांक), प्रफुल्ल तोताराम माळी ता.धुळे जि.धुळे (द्वितीय क्रमांक). कु.ऋषाली सर्जेराव कदम, स्वामी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर (तृतीय क्रमांक). आर्या हनुमंत पाटील औरंगाबाद, सौ रोहिणी श्रीकांत कोठावदे, ठाणे (उत्तेजनार्थ)
मोठा गट – कु.गौरी श्याम सातर्ले (प्रथम क्रमांक), समृद्धी सतीश हगारे (द्वितीय क्रमांक) भिगवण, कु.सिद्धी नितीन चितळकर (तृतीय क्रमांक), प्रज्वल विजयकुमार काळे, नैतिक अरुण मासाळ, पुणे (उत्तेजनार्थ).
लहान गट निकाल पुढीलप्रमाणे : ईरा संकेत वायसे जि.प.शाळा, भिगवण (प्रथम क्रमांक), शमिका संजय जगताप, लीड स्कूल करमाळा (द्वितीय क्रमांक), प्रसाद उमेश खेडकर, विद्या प्रतिष्ठान, सुपे (तृतीय क्रमांक). प्रज्वल अमोल लांभाते, बारामती, यशराज तात्यासो दडस, कुरबावी, इंदापूर(उत्तेजनार्थ) यांचा समावेश आहे.
तसेच राज्यस्तरीय वेशभूषा छायाचित्र स्पर्धाही संपन्न झाली त्याचे विजेते पुढील प्रमाणे – कु ऋतुजा गोकुळ वावरे माळेगाव ता. बारामती (प्रथम क्रमांक) कु. गौरी श्याम सातर्ले भिगवण ( द्वितीय क्रमांक), कु सिद्धिका दिलीप कुंभार, भिगवण (तृतीय क्रमांक). कु जान्हवी श्रीकांत करे निमगाव केतकी, इंदापूर (उत्तेजनार्थ) कु. समृद्धी सतीश हगारे भिगवण (उत्तेजनार्थ).
स्पर्धेचे परिक्षण डॉ काशिनाथ सोलनकर, नितीन चितळकर, महादेव बंडगर, नानासाहेब मारकड यांनी केले तर आयोजन आबासाहेब बंडगर, अनिल तांबे यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.