मुंबई : महान्यूज लाईव्ह
आजचा रविवार शिवसेना व भाजपच्या दोन आमदारांमधील टोकाच्या टिकेने गाजला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांच्यातील वाक् युध्दात बोचऱ्या टिकेने राजकीय खळबळ उडवली.
गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले. राऊत खातात शिवसेनेचे, मात्र जगतात पवारांच्या निष्ठेला अशी टिका करीत राऊत हे बिनबुडाचा लोटा आहे, अशा भाटांची धनगर समाजाला गरज नाही अशी टिका पडळकर यांनी केली होती.
त्याला शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी तशाच भाषेत प्रत्युत्तर दिले. मोठ्या माणसांवर नावानिशी काहीही आरोप केले की, आपले नाव मोठे होते असे समजणाऱ्यांपैकी गोपीचंद पडळकर आहेत, ते बांडगूळ आहेत आणि अशी बांडगुळे वाढत असतात अशी टिका शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी केली.