इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सामाजिक परिवर्तनात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मोठे योगदान आहे,असे प्रतिपादन माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले.
आज इंदापूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती कमिटीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पाटील म्हणाले,छत्रपती शाहू महाराज हे थोर समाज सुधारक होते. प्राथमिक शिक्षण,जातिभेद निवारण,अस्पृश्यता निवारण इत्यादी सुधारणांचे ते पुरस्कर्ते होते. यावेळी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती कमिटीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, नगरपालिकेचे गटनेते कैलास कदम, शकीलभाई सय्यद, उत्तम गायकवाड, संजय सानप, ललेंद्र शिंदे, संतोष देवकर, धनंजय पाटील, शेखर पाटील, बापू जामदार, प्रवीण राऊत, नागेश शिंदे, नाना जौंजाळ, सचिन जामदार, संदीप चव्हाण, प्रदीप जामदार, राहुल कदम व कार्यकर्ते उपस्थित होते.