दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : येथे आंतरराष्ट्रीय योगदिन पतंजली योग समिती, वाई यांच्या वतीने ब्राह्मणशाही येथील मुरलीधर मंगल कार्यालय येथे सकाळी 6 ते 7.30 या कालावधीमध्ये साजरा करण्यात आला.
आपले शरीर मन आणि आत्मा हे योग केल्याने जोडले जातात. योग साधनेमुळे आपले शरीर मनाला अध्यात्म आणि सामाजिक दृष्ट्या तंदुरुस्ती लाभते व आपले आरोग्य निरोगी होते. योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते. ते एकमेकांना जोडले जावून त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते.
भारतातील प्राचीन शास्त्र असलेल्या योगाची महती संपूर्ण जगाला पटली आहे.भारत सरकारच्या पुढाकारामुळे २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभरात साजरा केला जावू लागला. २०१५ पासून योग दिन साजरा केला जात असल्याने यावर्षी सातवा योग दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला गेला.
द्रविड हायस्कूल चे शिक्षक इनामदार यांनी 40 विद्यार्थ्यांना योग ऑनलाईन द्वारे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले. योग दिनानिमित्त योग प्रशिक्षक रामदास राऊत व धनंजय मलटने यांनी मुलांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.
योगशिक्षिका सुनंदा कट्टे, अपर्णा वाईकर, ज्येष्ठ योग प्रशिक्षक श्री. मित्रगोत्री, श्री. यादव, वाई तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार पी. एस.भिलारे, अतुल वाईकर, संतोष शिंदे, भैरवनाथ गव्हाणे, आबा कत्ते आदी योग शिक्षक या वेळेस उपस्थित होते.
द्रविड हायस्कूल चे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने झूम ॲप द्वारे आपली उपस्थिती नोंदवली.
योग दिनाच्या कार्यक्रमाचे स्वागत रामदास राऊत सर यांनी केले. धनंजय मलटणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना या कोरोना च्या महामारी मध्ये नियमित योग करावा व प्रतिकार क्षमता वाढवावी असा संदेश देण्यात आला.
या सुंदर योग दिनाच्या उपक्रमाबाबत वाई परिसरातील नागरिकांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे.











