सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : तालुक्यातील जंक्शन – वालचंदनगर येथील प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेली राधा खुडे कलर्स वाहिनीवरील सुर नवा ध्यास नवा या रियालिटी शोमध्ये तृतीय क्रमांकाची विजेती ठरली. तिच्या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला आत्ताच वेड लावले आहे. याचा अंतिम महाअंतिम सोहळा 13 जून 2000 21 रोजी पार पडला.
सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचा अंतिम फेरीत सहा स्पर्धक पात्र ठरले होते. यामध्ये राधा खुडे, रश्मी मोघे, प्रज्ञा साने, सन्मिता धापटे शिंदे, संपदा माने आणि श्रीनिधी देशपांडे यांचा समावेश होता. या स्पर्धेसाठी अवधूत गुप्ते आणि महेश काळे यांनी परीक्षण केले, तर स्पृहा जोशी या पाहुण्या परीक्षक होत्या. 13 जून रोजी ही महाअंतिम फेरी झाली. सन्मिता धापटे शिंदे ही स्पर्धक यावर्षीच्या सुर नवा ध्यास नवा चौथ्या पर्वाची महाअंतिम सोहळा ची विजेती ठरली. २ लाख आणि मानचिन्ह असा सन्मान समिता यांना मिळाला, तर द्वितीय क्रमांक गायिका संपदा माने यांनी तर तिसरा क्रमांक हा राधा खुडे हिने पटकावला.
राधा खुडे च्या विसरू कशी तुला, रांगणांग रांगणांग हलगी वाजते, मल्हारी भोळा, खंडोबाची कारभारीन या आणि अशा अनेक गाण्यांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. तिच्या आवाजाने अल्पावधीत महाराष्ट्रात सगळीकडे प्रसिद्ध झाली. राधा खुडेचे वैशिष्ट्य म्हणजे वालचंदनगर जवळील शिवाजी चौकामध्ये राहणारी अत्यंत सामान्य कुटुंबातील ही मुलगी! आई भाजीपाला विक्री चा रस्त्यावरील स्टॉल लावून शिलाई काम करते, तर वडील दत्तू खुडे मिळेल ते काम करून कुटुंबाचा गाडा हाकतात.
राधा हिने कला शिक्षक प्रशिक्षण घेतले असून तिचा पहाडी आवाज महाराष्ट्राच्या पसंतीला उतरला. महापुरुषांच्या जयंती विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आवडीने गाणी गाणारी राधा कलर्स मराठी वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावून गेली. तिच्या चांदणं चांदणं झाली रात या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले.











