• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून कर्जत-जामखेडसाठी पाच रुग्णवाहिका

Maha News Live by Maha News Live
June 14, 2021
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, लाईव्ह, व्यक्ती विशेष, Featured
0

नगर: महान्यूज लाईव्ह

कर्जत-जामखेडची आरोग्य व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. त्यानुसार मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पाच रुग्णवाहिका मिळाल्या असून आज (सोमवार) त्यांचे लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे रोहित पवार यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी सुमारे ४० रुग्णवाहिका मिळाल्या असून याबद्दल नागरिकांकडून कौतुक होत आहे.

आमदार झाल्यापासून रोहित पवार यांनी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी अनेक वेगवेगळे निर्णय घेतले. मतदारसंघातील दोन्ही तालुक्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढवण्यापासून तर आवश्यक उपकरणे पुरवणे, औषधे पुरवणे, मनुष्यबळ पुरवणे यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी दोन्ही तालुक्यात अद्ययावत कोविड सेंटर सुरू केले. आता त्यांच्याच प्रयत्नांतून मतदारसंघासाठी पाच रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत तीन तर राज्य शासनामार्फत मिळालेल्या दोन रुग्णवाहिकांचा समावेश आहे. रोहित पवार हे पूर्वी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि जिल्हा परिषदेमार्फत रुग्णवाहिका देण्याची संकल्पना पुणे जिल्हा परिषदेने राबवली होती. हीच संकल्पना नगर जिल्हा परिषदेतही राबविण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न केले.

त्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर सदस्यांना ही संकल्पना सांगितली. त्यांनाही ती पसंत पडल्याने पालकमंत्र्यांनी त्यासाठी निधीचे नियोजन केले आणि आज संपूर्ण नगर जिल्ह्यासाठी ४० रुग्णवाहिका मिळाल्या. हे पालकमंत्री, नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, अधिकारी, पदाधिकारी यांच्या प्रयत्नांचे यश आहे.

इतर ठिकाणी एखादी चांगली योजना असेल तर लोकांच्या हितासाठी ती आपल्या जिल्ह्यातही राबवणे तितकेच महत्त्वाचे असते, हे नगर जिल्हा परिषदेने दाखवून दिले. दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातूनही आणखी एक रुग्णवाहिका मिळाली आहे.

कोरोनाच्या दोन्हीही लाटेत सरकारी रुग्णवाहिकांची खूप मोठी मदत झाली, मात्र अनेक रुग्णवाहिका जुन्या झाल्याने त्यांच्या जागी नवीन रुग्णवाहिका मिळाल्या तर रुग्णांवर वेळेवर उपचार करणे शक्य होईल. त्यासाठी या रुग्णवाहिका उपयोगी पडतील.

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही आमदार रोहित पवार यांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दोन आणि आमदार निधीतून एक अशा तीन रुग्णवाहिका यापूर्वी दिल्या आहेत. त्यांचा खूप मोठा फायदा मतदारसंघाला झाला. आता आणखी पाच आणि सामाजिक संस्थेमार्फत एक अशा एकूण नऊ रुग्णवाहिका कर्जत-जामखेड मतदारसंघाला मिळाल्या आहेत. यामुळे कोरोनाची तिसरी लाट आली तर या रुग्णवाहिकांचा रुग्णांसाठी खूप मोठा फायदा होईल.

रोहित पवार, आमदार : मतदारसंघातील नागरिकांना अधिकाधिक उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर साहेब यांनी
मोठे सहकार्य केले, याबाबत त्यांचे आभार. त्यांच्या सहकार्यामुळे केवळ माझ्याच मतदारसंघाला नाही तर संपूर्ण जिल्ह्यासाठी ४० रुग्णवाहिका मिळाल्या याचा आनंद आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना अधिक तत्परतेने उपचार मिळण्यास मदत होईल.

Next Post

रात्रीच्या अंधारात गाड्यांमधून डिझेलची चोरी करत होते! स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने टोळीला केलेली अटक! पाच लाखांचा मुद्देमाल जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group