• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फलटणच्या आजोबांची प्रकृती जरी झाली गंभीर..
तरी पण ते होते, निर्धास्त; कारण काळजी घ्यायला डॉक्टरांप्रमाणेच `नात` ही होती खंबीर…!

Maha News Live by Maha News Live
June 12, 2021
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, महिला विश्व, आरोग्य, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

युवराज जाधव : महान्यूज लाईव्ह

सांगली – ही कहाणी आहे मिरजच्या नातीची…अन सातारा जिल्ह्यातील फलटणच्या आजोबांची…! कोविडने घराघरात अनेक समस्या आणून ठेवल्या.. आणि अनेकांच्या घरातील ज्योती काळाच्या आधीच विझवल्या…. त्यातही आयुष्याच्या संध्याकाळी कोरोना झालेल्यांना तर हा काळ जणू जिवघेणाच ठरला… मात्र यातून अनेकांनी कोरोनाला मात दिली.. फलटणमधील आजोबाही असेच कोरोनाशी झुंजता झुंजता थकू लागले.. तेव्हा मिरजच्या सरकारी दवाखान्यात प्रयोगशाळा परिचर असलेली नात त्यांच्यासह कुटुंबियांसाठी आशेचा किरण ठरली.

स्नेहा वेदपाठक यांच्या आजोबांचे वय ७७ वर्षे..! त्यांना अचानक अशक्तपणा वाटू लागल्याने नेहमीच्या डॉक्टरांकडे नेले. तेथे कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला. चाचणी केली, तर अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचार सुरू झाले. आजोबांना मधुमेह होता. त्यामुळे काळजी विशेषत्वाने घ्यावी लागणार होती. अशातच एका दवाखान्यात चुकीचे सलाईन लावल्याने त्यांना त्रास सुरू झाला. त्यांची रक्तातील साखर वाढली. मात्र या प्रकारात त्यांची ऑक्सिजनची मात्रा मात्र झपाट्याने खालावली. त्यातच एचआरसीटी स्कोअर तपासल्यानंतर तो १७ आल्याने सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली.

६८ टक्के फुफ्फुसाला संसर्ग झाल्याने व्हेंटीलेटरची गरज भासणार म्हणून कोठे उपचारासाठी बेडही उपलब्ध होईनात. मग स्नेहा यांनी त्या काम करीत असलेल्या मिरज सिव्हील हॉस्पिटलमध्ये बेडची चौकशी केली. बेड शिल्लक नव्हता. मात्र काही काळानंतर एक रुग्ण दगावल्याने बेड उपलब्ध होईल असे डॉक्टरांनी सांगताच आजोबांना तिकडे हलवले. मिरजला पोचेपर्यंत रात्रीचे दिड वाजले होते आणि तेव्हा आजोबांची ऑक्सिजनची मात्रा ७५ पर्यंत घसरली होती. नातीने जबाबदारीने आजोबांना येथे आणले आणि आता त्यांची प्रकृती अधिक गंभीर बनत गेली तर काय करायचे हा प्रश्न पुढे होता. . स्वतः कर्मचारी असल्याने थेट अतिदक्षता विभागापर्यंत जाण्याची परवानगी होती. तेथील आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांनी धीर दिला आणि उपचाराला सुरवात झाली.. डॉ. हर्षवर्धन, डॉ. ओजस, डॉ. प्रसन्न यांनी तत्परतेने उपचार सुरू केले. उपचारास प्रतिसाद मिळू लागला. तीन दिवसांनंतर कोरोना निगेटिव्हचा अहवाल आला. मात्र ऑक्सिजनची मात्रा वाढत नव्हती..

रेमेडीसीव्हीर देण्याची गरज भासणार असल्याची माहिती देण्यात आल्यानंतर आजोबांचे काय होणार म्हणून रडत बसलेल्या स्नेहाला डॉक्टरांनी धीर दिला. रेमीडीसीवीर हा पर्याय आहे, मात्र त्यानंतर त्यांना उदभवणाऱ्या समस्यांचे काय असा प्रश्न तिच्यापुढे होता. त्यावरून तेथील डॉक्टरांनी स्नेहा यांना फुफ्फुस तज्ज्ञ डॉ. वाघ यांचा संपर्क क्रमांक दिला. मिरजच्याच सिव्हील हॉस्पिटलमधले प्रसिध्द डॉक्टर असलेल्या वाघ यांनी स्नेहा यांच्या विनंतीला लागलीच प्रतिसाद देत आजोबांची तपासणी केली व न्युमोनिया असल्याने त्या दृष्टीने तातडीेने उपचार करू असा सल्ला दिला आणि त्यानुसार उपचाराला सुरवात झाली. तीन दिवसांनंतर आजोबा या परिस्थितीतून बाहेर आले.. त्यांची ऑक्सिजनची मात्राही वाढली. फलटणला आता त्यांना अगदी ठणठणीत बरे करून नेता येणार असल्याने स्नेहा यांना दिलासा मिळाला… आणि नात आणि आजोबा हसायला लागले…!

Next Post

गुन्हेगार होता हैवानाचा पोरगा एवन! ..दरोडाही तशाच किंमतीचा...पण पोलिस निघाले A1+.. म्हणूनच तीन दिवसात गुन्हेगार तुरुंगात आणि 15 लाखांचे दागिने फिर्यादींच्या हातात..! गेलेलं स्त्रीधन परत मिळालं अन् त्यांचे डोळे पाणावले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group