अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे व तहसिलदार सैफन नदाप यांची धडाकेबाज कारवाई
संदीप मापारी पाटील, लोणार, बुलढाणा
सावरगावतेली येथे रेतीघाटाच्या तपासणीदरम्यान अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे व लोणार तहलिसदार सैफन
नदाफ यांनी काही वाहनांची आकस्मीत तपासणी केली. तपासणी दरम्यान चार वाहनांमधून रेती वाहतूक केली जात होती. त्यामुळे त्यांनी या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून या चार वाहनधारकांना 11 लाख 20 हजार रूपये दंड ठोठावला.
बुलडाणा अप्पर जिल्हाधिकारी व तहसिलदार लोणार यांनी संयुक्तरित्या अवैधरेती वाहनाची तपासणी केली असता चार वाहनाजवळ वाहतुक पासेस नसल्याचे आढळुन आले. यामध्ये (एम एच 20 सी टी 1421, एम एच 38 डब्ल्यु 9313, एम एच 12 ए जी 7747, व एक विना क्रमाक) चार वाहने अवैधरित्या रेती वाहतुक करतांना आढळुन आली. त्यावर धडक कारवाई करत 8 लाख 76 हजार रूपयाचा दंड आकारला.
त्या अगोदर सकाळी 7 वाजता लोणारचे तहसीलदार सैफन नदाफ यांनी अंजनीखुर्द येथे आपल्या पथकासह अवैध गौण खनिज वाहतुक करणाऱ्या वाहनावर (क्रं एम एच 28 बीबी 8275) कारवाई करत 2 लाख 44 हजार रूपये दंड आकारला. या धडक कारवाईमध्ये तहसिलदार सैफन नदाफ, नायब तहसिलदार हेंमत पाटील, महसुल सहाय्यक भगवानराव मुसळे, यांनी सहभाग घेतला.
लोणार तालुक्यात तब्बल 11 लाख 20 हजार रूपयांचा विक्रमी दंड आकारण्यात आल्याने या कारवाईचा अवैध रेती वाहतुक करणाऱ्या रेती माफीयांनी धसका घेतला आहे.











