माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दादा कोंडके यांच्या जन्मभूमी असलेल्या इंगवली ( ता. भोर ) येथील भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने नुकतेच रक्तदान शिबिर राबविण्यात आले आहे. शिबिरात तरुणांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला असून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
उभ्या महाराष्ट्राला हसवणारे दादा कोंडके यांच्या इंगवली जन्मभूमी गावातील भैरवनाथ तरूण मंडळ आणि अक्षय ब्लड बँक हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर पार पडले. सागर बांदल, अजय बांदल, अभिनंदन गोळे, शेखर बांदल, अक्षय बांदल, आकाश कारभळ, संभाजी कारभळ, संतोष काळ्हाणे, अमर गायकवाड यांच्या पुढाकरातून रक्तदान शिबिर पार पडले.
विशेष म्हणजे एका छोट्याशा गाववस्तीतून ५१ रक्तपिशव्यांचे संकलन झाल्याने डॉक्टरानी समाधान व्यक्त केले. आयोजकांच्या वतीने रक्तदान केलेल्या युवकांना प्रमाणपत्र देण्यात आले. दरम्यान रक्तदान करण्यापूर्वी संपुर्ण निर्जंतकीकरण करण्यात आले होते.
फोटो – इंगवली ( ता. भोर ) येथे रक्तदान शिबिरात तरुणाचा मिळालेला प्रतिसाद











