नगर : महान्यूज लाईव्ह
देश कोरोना संक्रमणाच्या विळख्यात सापडला असून, यातून बाहेर पडण्यासाठी सर्वजण प्रचंड प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांनी कर्जतमधील कोविड सेंटरला भेट दिली असून, तेथील रुग्णांबरोबर सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर थिरकत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहे.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता
रोहित पवार कर्जत येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी कोरोना रुग्णांची मानसिक स्थिती जाणून घेवून, त्याचबरोबर रुग्णाची संवाद साधत त्यांना धीर दिला. रुग्णांचे मनोबल वाढावे तसेच मनोरंजन व्हावे, म्हणून सैराट चित्रपटातील झिंगाट या गाण्यावर रूग्णांबरोबर ठेका देत डान्स केला.
एरवी राज्य आणि देश पातळीवरील राजकारण आणि अन्य विषयांवर भाष्य करणाऱ्या रोहित पवारांना रुग्णांसोबत ठेका धरताना पाहून रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी केलेले प्रयत्नांमुळे त्यांनी पुन्हा एकदा सामान्य जनतेचे मन जिंकले.
दरम्यान, “गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या ‘झिंगाट’ गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो.” अशी माहिती रोहीत पवारांनी ट्विटद्वारे दिली आहे.











