मुंबई : महान्यूज लाईव्ह
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सदैव चर्चेत असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह आज दिवसभर चर्चेत राहील्या. त्यांना श्वास घेण्यात अडथळा येत असल्याने मुंबईतील अंबानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही दिवसा्ंपूर्वीच त्यांनी गोमूत्राची जाहीरात केली होती. गोमूत्र पिल्याने मला काहीच त्रास होत नाही असे त्या म्हटल्या होत्या. आज त्यांना त्रास होत असल्याने दवाखान्यात दाखल व्हावे लागले.
लोकसभा मतदारसंघातील पंचायत समिती व जिल्हा परीषदेच्या कामाच्या निमित्ताने त्यांनी एक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीपूर्वीच त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाठीमागील काही दिवसांपूर्वीच त्यांनी गोमूत्र प्यायल्यास कोरोनाची लागण होत नाही असा दावा केला होता. तसेच आपण दररोज गोमूत्र पित असल्याने मला काहीच त्रास होत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मिडियातून त्यांच्यावर मोठी टिकेची झोड उठली होती. आता खुद्द प्रज्ञासिंहांनाच दवाखान्यात दाखल व्हावे लागले आहे.











