ऋतुजा थोरात : महान्यूज लाईव्ह
एकीकडे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे तर, दुसरीकडे लसींचा तुटवडा निर्माण होत असून, कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेवून RBI कडून मिळालेले अतिरिक्त 99 हजार कोटी यासाठी वापरण्यात यावे. असे म्हणत रोहित पवार यांनी केंद्र सरकारला आर्थिक धोरण आखण्याचा सल्ला ट्विटद्वारे दिला आहे.
रोहीत पवारांनी केलेले ट्विट,”देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून, केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली 35 हजार कोटी ₹ ची तरतूद आणि @RBI कडून मिळालेले अतिरिक्त 99 हजार कोटी ₹ या कार्यक्रमासाठी वापरता येतील.”
याव्यतिरिक्त, त्यांनी राज्ये स्वतःच्या पायावर उभी राहिली तर देश उभा राहील. त्यासाठी राज्याची लोकसंख्या, तिथे कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव आणि #GST मध्ये संबंधित राज्याचा वाटा यानुसार राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीचे प्रमाण ठरवावे. अस केल तर कोरोनावर आपण लवकर नियंत्रण मिळवू शकू!’ असेही रोहीत पवारांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, देशाला तात्काळ कोरोना लसीकरण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी रोहित पवारांनी ट्विट करून RBI कडून मिळालेले अतिरिक्त 99 हजार कोटी लसीकरणासाठी वापरावे असे म्हटले आहे. इतकेच नाहीतर, यावेळी त्यांनी कोरोना रोखण्यासाठी कसे नियोजन केले पाहिजे याचाही सल्ला केंद्राला दिला आहे.











