मुंबई : महान्यूज लाईव्ह
तॉकत्ये चक्रीवादळाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोकणाचा दौरा नियोजित केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी विमानतळावरच आढावा घेऊन दौरा आटोपला अशी टिका करीत नितेश राणे यांनी यालाच लिपस्टीक दौरा म्हणतात, फडणवीसजींनी ७०० किलोमीटरचा दौरा केला आणि मुख्यमंत्र्यांचा कोणत्याच गावाला भेट नाही, फक्त १० किलोमीटरवरच त्यांचा दौरा संपला अशी टिका केली.
आजच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून नितेश राणे यांनी कोकण सब का हिसाब करेगा, याद रखना शिवसेना असा इशारा दिला आहे.
र दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे घराबाहेर यावे लागले अशी टिका करीत काय राव देवेंद्रजी असा मार्मिक टोला मारला आहे. याबरोबरच फक्त तीन तासांत पर्यटन शक्य नसल्याने किती जणांचे सांत्वन केले हे फक्त विचारू नका असा टोला मारला आहे.
नितेश राणे यांनी ट्विट करीत हा लिपस्टीक दौरा असल्याची टिका केली, दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्याचे मात्र कौतुक केले आहे. आमचा नेता लय पॉवरफुल्ल असे वर्णन करीत आंब्यांच्या नुकसानग्रस्त बागांची पाहणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
प्रविण दरेकर यांनी या दोघा्ंच्या दौऱ्याबद्दल ट्विट करताना पुलावरून हात दाखवून सातच्या आत घरात या मालिकेनंतर आता हात दाखवून तीन तासांच्या आत घरात ही मालिका सुरू असल्याची टिका केली आहे.











