महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
चिपको आंदोलनाचे नेते व राष्ट्रीय पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनाने निधन झाले. त्यांच्या निधनाने पर्यावरण चळवळीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. एम्स मध्ये उपचारादरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
बहुगुणा हे ९४ वर्षांचे होते. त्यांना ८ मे रोजी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना एम्स मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत गेली.
९ जानेवारी १९२७ रोजी मरोडा येथे जन्मलेल्या सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलनाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले.
धरती की पुकार, इंडियाज एन्व्हायर्नमेंट ः तथ्य व वास्तव, द रोड टु सर्व्हायव्हल ही पुस्तके त्यांनी लिहीली.
पर्यावरण गांधी, हिमालय रक्षक अशा विविध नावांनी ते देशभऱात ओळखले जात होते. केंद्र सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. दलितांना मंदिरात प्रवेशाचा अधिकार देण्यासाठी त्यांनी पहिले आंदोलन केले आणि सन १९७१ मध्ये दारुची दुकाने उघडण्यास विरोधासाठी १६ दिवसांचे उपोषण त्यांनी केले. उत्तराखंडमधील मोठ्या धरणा्ंच्या विरोधात त्यांनी दिर्घकाळ आंदोलन केले.











