मुंबई : महान्यूज लाईव्ह
खतांच्या दरवाढीवरून केंद्र सरकार टिकेच्या घेऱ्यात अडकल्यानंतर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्रीय कृषीमंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहीले, सरकारने तातडीने दखल घेतली. खतांचे अंशदान कायम ठेवले. मात्र आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खत दरवाढीला शरद पवार यांचेच धोरण कारणीभूत असल्याची टिका केली आहे.
खत दरवाढीला शऱद पवार यांनी पत्र लिहीले, मात्र तेच कारणीभूत आहेत. युपीए सरकारच्या काळात शरद पवार व तत्कालीन आघाडी सरकारने जे निर्णय घेतले, त्यामुळेच खत दरवाढीला सामोरे जावे लागले. त्यांच्या काळातच पोषण अन्नद्रव्यांवर आधारीत अनुदान धोरण राबविण्यात आले. ज्यामुळे फॉस्फेटिक व पोटॅश खतांमधील डीएपीसारख्या खतांचे अनुदान मर्यादित ठेवावे आणि कंपन्यांना खताच्या विक्री किंमती ठरविण्याची मोकळीक द्यावी असे हे धोरण होते. त्यामुळेच कंपन्यांनी दरवाढीचे स्वातंत्र्य मिळवले असे केशव उपाध्ये स्पष्ट केले आहे.











