मोहोळ मध्ये पंच्याहत्तरी पार केलेल्या सखुबाई पवार आज्जींनी जिद्दीच्या जोरावर ऑक्सिजन पातळी कमी असताना देखील कोरोनावर केली मात
आमदार यशवंत माने व पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते आजीचा केला सन्मान
मोहोळ : महान्यूज लाईव्ह
माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १ मे रोजी महाराष्ट्र दिनी मोहोळ येथे सुरू केलेल्या डेडिकेटेड केव्हीड सेंटर सध्या कोरोना रुग्णासाठी जीवनदायी ठरू लागले आहे. मागील काही दिवसांपूर्वीचीच घटना.. मोहोळ तालुक्यातील अंकोली गावातील ७५ वर्षीय सखुबाई पवार या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आणि कोरोनावर मात करून ठणठणीत देखील झाल्या.
या आजींसह कोरोनावर मात केलेल्या अन्य रुग्णांचा आमदार यशवंत माने, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ७५ वर्षीय आजीला त्रास होऊ लागल्याने मोहोळ येथील डेडीकेटेड केव्हीड सेंटर ला ॲडमीट केले. त्यावेळी आजीची ऑक्सिजन लेवल ही ३५ ते ४० होती. मात्र डॉक्टर गवाड यांनी व त्याच्या सर्व टिम ने त्या आजीसाठी अथक परिश्रम घेतले…
अखेर या आजीचा दुसरा जन्म झाला आणि त्या गुरुवारी (दि.१३) रोजी कोरोनावर मात करून त्या ठणठणीत झाल्या. त्या आजीसह अन्य कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आमदार यशवंत माने, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आमदारांनी आपली विचारपूस केल्यावर त्या आजीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, उपनगराध्यक्ष बापू डोके, जयवंत गुंड, डॉ. गवाड, बंडू देसाई, मुन्ना बागवान, मिलिंद आष्टुळ, राजेश सुतार यांच्यासह इतर उपस्थित होते.











