हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण येथे 100 बेडचे तयार केलेले विलगीकरण केंद्र सर्व ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी – अंकिता पाटील
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
भिगवण येथे ग्रामपंचायतच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड संशयित रुग्णांसाठी उभारलेल्या 100 बेडचे संस्थात्मक विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे, हे विलगीकरण केंद्र सर्व ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी केले.
भिगवण ग्रामपंचायत च्या वतीने उभारलेल्या 110 बेडच्या विलगीकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या हस्ते झाले.
पाटील म्हणाल्या, सध्या ग्रामीण भागातही कोरोना झपाट्याने वाढत चालला आहे. हा प्रसार थांबविण्याकरिता संशयित रुग्णांना विलगीकरण करणे व त्यांच्यावरती उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून हा प्रसार थांबवता येईल. भिगवण ग्रामपंचायतने हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे 100 बेडचे विलगीकरण केंद्र चालू केले आहे हे अत्यंत कौतुकास्पद व सर्व ग्रामपंचायतीसाठी प्रेरणादायक आहे. जर सर्व ग्रामपंचायतींनी असे संस्थात्मक विलगीकरण केंद्र चालू केले तर नक्कीच कोरोना आटोक्यात येईल.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव, इंदापुर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, संपत बंडगर, सरपंच तानाजी वायसे, जावेद शेख, तुषार क्षीरसागर, कपिल भाकरे, जयदीप जाधव, हरिभाऊ पांढरे, सत्यवान भोसले, पत्रकार भरत मल्लाव, प्रशांत चवरे, सुरेंद्र शिरसट व इतर यावेळी उपस्थित होते.











