बारामती : महान्यूज लाईव्ह
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब नलावडे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून मुर्टीतील शिववजयंती उत्सव समिती, सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले. यामध्ये १०६ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव समिती, सह्याद्री प्रतिष्ठान, तसेच अभिजीत नलावडे, शरद साळुंखे, राहुल चव्हाण, सचिन जगदाळे, निलेश शेलार, स्वप्निल शहा, दिनेश भोसले, निलेश मांढरे, तुषार जगदाळे, श्रीकांत बालगुडे, संजय खोमणे, शिवा गदादे, सनी बालगुडे, रवी शिंदे, दशरथ गदादे यांनी केले होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुर्टी गावातील तरुण युवकांनी एकत्र येऊन रक्तदान शिबिर घेतले.
सभापती प्रमोद काकडे यांनी तसेच बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनीही युवकांचे कौतुक केले. रक्तदात्या युवकास प्रमाणपत्र तसेच एक वर्षाकरिता मेडिक्लेम देण्यात आला. मुक्ताई ब्लड बँक इंदापूर यांनी रक्तदान शिबिरात सहकार्य केले.
कार्यक्रमास संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनवान वदक-देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया अध्यक्ष सुनिल बनसोडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विक्रम भोसले, हनुमंत बालगुडे, बारामती दूध संघाचे माजी उपाध्यक्ष वैभव मोरे, बाळासाहेब जगदाळे, नानासाहेब जगदाळे, सतिश जगदाळे, तानाजी खोमणे, डॉ. अविनाश ननावरे, नानासाहेब गदादे, उपसरपंच निलेश मासाळ आदी उपस्थित होते. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे सरचिटणीस निलेश शेलार यांनी आभार मानले.











