दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि जागृत असलेल्या वेळे (ता. वाई) या गावामध्ये गेल्या महिन्यापासून कोरोना रोगाने थैमान घातले असून आजअखेर जानेवारी महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८७ वर पोहोचली असून येथील ५ नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला. ही वाताहत थांबवण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेत बैठक बोलावली.
गावातील बाधित असून देखील रूग्ण घराबाहेर पडतात व इतर नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने प्रादुर्भाव वाढून गावाला विळखा बसत असल्याने सरपंच रफिक इनामदार यांनी ही बैठक गावाला कोरोनोच्या विळख्यापासून वाचविण्यासाठी उपाययोजना आखण्याकरीता बोलावली
गावातील आजी माजी सैनिक, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक तसेच शासकीय उपकेंद्रातील सर्व अधिकारी यांची आज सकाळी १० वाजता बैठक बोलावून वाढती रुग्णसंख्या तातडीने थोपविण्यासाठी बैठकीत उपस्थित सर्व ग्रामपंचायतींच्या सदस्य व नागरिक यांच्याशी विचारविनिमय केला.
यावेळी सरपंच रफिक इनामदार यांनी गावामध्ये वाढती कोरोना रूग्णसंख्येवर गावातील सर्वच नागरिकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक असून कोणीहि अनावश्यक रस्त्यावर फिरु नका असे आवाहन केले. मास्कचा वापर न करणे, समांतर अंतर न ठेवणे अश्या गंभीर बाबींकडे घराघरातील पालकांचे दुर्लक्ष झाल्याने हे संकट गावावर कोसळले आहे. एरवी गावातील नागरिकांचे महामार्गावरील अपघाताने मृत्यू होत होते, त्यावेळी जबाबदार वाहनावर गाव एक होऊन तुटून पडायचे, पण आज कोरोना रोगाने आपल्याच गावात थैमान घातले आहे. याचे भान विसरता कामा. या रोगाला सर्वांनी एकत्र येऊन मुकाबला करावा लागेल.
हा रोग थोपविण्यासाठी येथील आरोग्य उपकेंद्रातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन बाधित असलेल्या रुग्णासह कुटुंबातील सदस्य रस्त्यावर फिरताना आढळल्यास अशांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, त्यासाठी आरोग्य कर्मचा-यांना गावातील प्रतिष्ठित व ग्रामपंचायत सदस्य नेहमीच सहकार्यासाठी पुढाकार घेईल. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून दुसरी लाट थोपविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. वैयक्तिक मतभेद बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्रित सहकार्य करावे असे सरपंच रफिक इनामदार यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य शशिकांत पवार, माजी सरपंच दशरथ पवार, निलेश डेरे, दत्तात्रय लांडगे, स्वप्निल कांगडे, विजय पवार, गणेश भिलारे, फतमाबी मोकाशी, संतोष नलावडे, संगीता पवार, शीतल पवार, रोहिणी भिलारे, सीमा हिरवे, मंगल पवार, पोलीस पाटील तनुजा पवार, संगीता बा. पवार, नूतन खडसरे, मंगल देशमुख, स्वप्ना पवार, नारायण पवार,शिवाजी पवार, धोंडीराम वाडकर, भरारी पथकाचे शिवाजी पवार, धोंडीराम वाडकर व एस. डी. राऊत, ग्रामसेवक हिंदुराव डेरे आदी या सभेला उपस्थित होते.











