इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कोरोना रुग्णांची संख्या वाढीचे प्रमाण निमगाव केतकीत वाढले होते, मात्र गाव व परिसरातील सर्व नागरिकांनी मागील दोन आठवड्यापासून कोरोना रोगाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या सर्व निर्णयांना मनापासून समर्थन दिले व घरात राहून सहकार्य केले. त्यामुळे रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे,असे मत निमगाव केतकी चे सरपंच प्रविण डोंगरे यांनी व्यक्त केले.
मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे प्रशासनाला कडक निर्णय घ्यावे लागले.गावात आरोग्य विभागाच्या सहकार्याने त्यांच्या पथकाकडून गावात रॅपीड ॲन्टीजेन चाचणी घेण्यात आली होती.नागरिकांना प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.
दोन आठवड्यात रुग्ण कमी होत आहेत ही चांगली बाब आहे. त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे ग्रामपंचायत निमगांव केतकीच्या वतीने सरपंच प्रविण डोंगरे यांनी आभार मानले. येणाऱ्या दहा दिवसांमध्ये हाच संयम कायम ठेवून विशेषतः व्यापारी वर्गाने सहकार्य करून कोरोना नियंत्रणामध्ये प्रत्येकाचा वाटा उचलून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी,अशी अपेक्षा प्रविण डोंगरे यांनी व्यक्त केली.











