दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनोची साखळी तोडण्यासाठी सहाय्यक निरीक्षक रविंद्र तेलतुमडे,
फौजदार राजेंद्र कदम यांनी आज सकाळी पहाटे पासूनच बेशिस्त दुचाकीस्वार व चार चाकी स्वरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आणि सगळीकडे धावपळ झाली.
वाई पोलिस ठाण्यातील पोलिसांनी किसनवीर चौक आणि वाई शहराकडे येणाऱ्या प्रवेशव्दारावर असलेल्या वाई कोर्टासमोर पहाटेपासूनच जे अनावश्यक फिरत होते, त्यांच्यावर पहाटेपासूनच कारवाई सुरू केली. शेकडो दुचाकी व चारचाकी वाहन चालकाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.
या धडाकेबाज कारवाईमुळे वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली. या पकडलेल्या वाहन चालकांकडे चौकशी करुन अनावश्यक फिरणारी वाहने जप्त करुन दंडात्मक कारवाई केली. पोलिसांच्या या दंडात्मक कारवाईमुळे सगळीकडे धावपळ झाली व अनावश्यक फिरणाऱ्यांना योग्य तो संदेश गेला.











