मुंबई : महान्यूज लाईव्ह अलीकडील काळात भाजप नेते उद्विग्नपणे वक्तव्ये करत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या व्यक्तव्यांमध्ये काहीच तारतम्य राहिलेले नाही. तुम्ही इतरांचे बाप काढत आहात. परंतु तुमच्या बापाला बाप म्हणायला वारसदार तरी आहेत का..? असा सवाल करत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. कोणतेही वक्तव्य करताना तारतम्य बाळगा; अन्यथा जशाला तसे उत्तर द्यायला राष्ट्रवादी तयार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पुणे महानगरपालिकेतील सत्तेबाबत अजित पवार यांना काही स्वप्न पडत असतील, तर त्यांनी ऊर्जा वाया घालवू नये. कारण आम्हीही तुमचे बाप आहोत असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ...