• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या मार्गावर..? भाजपचे अनेक नेतेही संपर्कात

Maha News Live by Maha News Live
September 23, 2020
in राजकीय, मुंबई, राष्ट्रीय, राज्य, लाईव्ह, विदर्भ, व्यक्ती विशेष
0
एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या मार्गावर..? भाजपचे अनेक नेतेही संपर्कात

राष्ट्रवादीकडून भाजपला जळगावमधून धक्का देण्याची तयारी

मुंबई : महान्यूज लाईव्ह

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कुरघोड्यांना कंटाळलेल्या एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आज मुंबईत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चाही केल्याचे समजते. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्याप्रमाणेच भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे आली आहे.

विधानसभा निवडणुकीत कन्या रोहिणी खडसे यांच्या पराभवाला देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा आरोप करत एकनाथ खडसे यांनी अनेकदा त्यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात आयोजित केलेल्या मेळाव्यातही एकनाथ खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच फडणवीस यांच्यासह पक्षांतर्गत कुरघोड्यांबाबत आपले मन मोकळे केले होते. तेव्हापासून अनेकदा खडसे यांनी जाहीरपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली.

दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या आणि पक्षात येवू इच्छिणाऱ्या नेत्यांची चाचपणी करण्याची जबाबदारी टाकली आहे. त्यानुसार भाजपला पहिला धक्का उत्तर महाराष्ट्रातून अर्थात एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवून देण्याची तयारी करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने आज मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात स्वत: शरद पवार यांच्यासह अजित पवार, जयंत पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचेही समजते.

एकीकडे एकनाथ खडसे यांची वाढत असलेली नाराजी, भाजपमध्ये त्यांचे कमकुवत होत असलेले स्थान, फडणवीस यांच्याकडून होणारी गळचेपी या बाबी लक्षात घेत त्यांना राष्ट्रवादीत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचवेळी भाजपचे अनेक मातब्बर नेतेही राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा होत आहे. दरम्यान, सध्यातरी राष्ट्रवादीने वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे दिसत असले तरी पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असल्याने लवकरच भाजपला मोठा धक्का बसेल का याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  

Tags: bjp maharashtraDCM Ajit PawarEknath KhadseJayant PatilNationalist Congress PartySharad Pawar
Next Post
इंदापूर तालुक्यातील विविध प्रकल्पांच्या सर्वेक्षणासाठी ५ कोटींची तरतूद; भरणे यांनी करून दाखवले

इंदापूर तालुक्यातील विविध प्रकल्पांच्या सर्वेक्षणासाठी ५ कोटींची तरतूद; भरणे यांनी करून दाखवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group