महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी व काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
श्री फडणवीस यांनी कोरोना चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर लागलीच स्वतःला विलगीकरण केले असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरु असल्याची माहिती दिली आहे. आज त्यांनी ही माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली असून यामध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा काम करण्यात गेला, पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे अशी परमेश्वराची इच्छा असावी असे नमूद केले आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेटेड केले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
चार दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अवकाळी पावसाच्या नुकसान पाहणीचा दौरा केला होता. त्याची सुरुवात बारामती येथून केली होती. त्यांनी बारामती, दौंड, इंदापूरसह सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहणी केली होती. या दरम्यान त्यांच्या संपर्कात अनेक राजकीय पदाधिकारी आले होते.










