बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यात हळूहळू कासवगतीने पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. काल बारामती तालुक्यात मानाजीनगर, धुमाळवाडी व पणदरे येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासकीय मोहिमेअंतर्गत दुसऱ्या टप्प्याचे कोरोना शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये मानाजी नगर येथे 7, तर धुमाळवाडी गावांमध्ये 8 जण कोरोनाबाधित आढळून आले. पणदरे येथेही 2 जण कोरोनाबाधित आढळून आले. सहाजिकच काल 17 रुग्ण गावागावातील मोहिमेत आढळून आले, तर बारामतीत शासकीय व खाजगी प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीमध्ये 25 जण कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यामुळे काल दिवसभरात तब्बल 42 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
बारामती तालुक्यात काल झालेल्या विविध तपासण्यांमध्ये आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सांगवी येथील 28 वर्षीय महिला, आठ वर्षीय मुलगी, नऊ वर्षीय मुलगी, 50 वर्षीय महिला, 47 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला,भोंडवेवाडी येथील 35 वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील 80 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
देवळे पार्क येथील 25 वर्षीय महिला, शेटफळगढे येथील 26 वर्षीय महिला, 48 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, खोरोची येथील 45 वर्षीय महिला, अवधूत नगर येथील 23 वर्षीय पुरुष 43 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे.
बारामती येथे तपासलेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोतानगर येथील 39 वर्षीय महिला, सोमेश्वर नगर येथील 43 वर्षीय महिला, 34 वर्षीय महिला, म्हसोबावाडी येथील अकरा वर्षीय मुलगी, पाच वर्षीय मुलगा, 34 वर्षीय महिला, मालुसरेवाडी येथील 74 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 48 वर्षे पुरुष, 13 वर्षीय मुलगा, 45 वर्षीय महिला व मेखळी येथील 59 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
बारामतीत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सांगवी येथील 33 वर्षीय पुरुष उंडवडी सुपे येथील 33 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला असून चिंचकर इस्टेट येथील 35 वर्षीय पुरुष रुग्णासही कोरोनाची लागण झाली आहे.











