• Contact us
  • About us
Wednesday, September 16, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उजनीतील प्रस्तावित मासेमारी ठेक्याविरोधात मच्छिमारांचे ४० गावात उपोषण! उजनीतील मासेमारी ठेक्याविरोधात मच्छिमार आक्रमक!

mahaanewslive by mahaanewslive
September 7, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
उजनीतील प्रस्तावित मासेमारी ठेक्याविरोधात मच्छिमारांचे ४० गावात उपोषण! उजनीतील मासेमारी ठेक्याविरोधात मच्छिमार आक्रमक!

भिगवण : उजनी जलाशयातील प्रस्तावित मासेमारीच्या ठेक्याला विरोध करण्यासाठी जलाशय परिसरातील स्थानिक मच्छिमारांनी पुकारलेल्या आंदोलनाला विविध गावांतून प्रतिसाद मिळाला. भिगवणसह उजनी जलाशय परिसरातील ४० ते ४५ गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयांसमोर मच्छिमारांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून प्रस्तावित ठेक्याला तीव्र विरोध दर्शविला.

सरकार रोजगारनिर्मितीची भूमिका मांडत असताना पारंपरिक पद्धतीने उपलब्ध असलेला मासेमारीचा व्यवसायच काढून घेतला जात असल्याचा आरोप ‘उजनी मच्छिमार बचाव अभियान’च्या पदाधिकाऱ्यांनी केला. ऊन, वारा, पाऊस आणि थंडीचा सामना करीत मासेमारीच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छिमारांच्या रोजगारावर गदा आल्यास त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून उजनी जलाशयातील मासेमारीचा ठेका काढण्यात आल्याने हजारो स्थानिक मच्छिमारांमध्ये नाराजी आहे. प्रस्तावित ठेकेदारीमुळे पारंपरिक मच्छिमारांसह भूमिहीन, पारधी आणि मागासवर्गीय मच्छिमारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची तीव्रता वाढत असून, संबंधित गावांच्या ग्रामपंचायतींकडून ठेक्याला विरोध करणारे ठराव देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

दरम्यान, आंदोलनाची दखल घेत ४० हून अधिक ग्रामपंचायतींनी यासंदर्भात ठराव देण्यास सुरुवात केल्याचे अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मच्छिमारांच्या पारंपरिक रोजगाराचे संरक्षण आणि उपजीविकेचा प्रश्न ग्रामपंचायत ठरावांमधून मांडला जात असल्याने आंदोलनाला पुढील काळात कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर आधार मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

या आंदोलनादरम्यान फासेपारधी समाजातील मच्छिमारांनीही प्रशासनावर खोचक टीका केली. “उजनीतील मासेमारीमुळे चोऱ्या-माऱ्या सोडल्या आहेत; आमचा रोजगार काढून घेतला तर तुमचे काम पुन्हा वाढेल,” असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला. भिगवण, पळसदेव, राजेगाव, मलठण, डाळज, केतूर, बाभूळगाव, कात्रज, खानोटा, डीकसळ, चिखलठाण, रामवाडी, भादलवाडी, कुंभारगाव, सोगाव, खातगाव, आजोती, सुरळी, कळाशी, दिलमेश्वर, कुगाव, कोंढार चिंचोली, गलांडवाडी, टाकळी आदी गावांमध्ये मच्छिमारांनी उपोषण केले.

उजनी जलाशयातील मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवावा आणि स्थानिक मच्छिमारांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. अभियानाचे पदाधिकारी चंद्रकांत भोई, अनिल नगरे, अनिता नगरे, उज्वला परदेशी, विक्रम शेलार, बाळासाहेब काळे, दत्तात्रय व्यवहारे, संजय दरदरे, शरद गलांडे, हरिभाऊ जाधव, सदगुरू शिंदे, अंगात गायकवाड, अमोल पतुरे, नाना दरदरे, उत्तम दरदरे, बाळासाहेब गाडेकर, चिंतामण तिकोणे, पिंटू शिंदे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

Next Post
मराठा आरक्षणासाठी वाईत कडकडीत बंद; मुंबईच्या लढ्यासाठी समाजाचा निर्धार!

मराठा आरक्षणासाठी वाईत कडकडीत बंद; मुंबईच्या लढ्यासाठी समाजाचा निर्धार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group