• Contact us
  • About us
Tuesday, September 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवार ‘संस्थापक’ ठिक, पण ‘मालक’? उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत; चक्क शरद पवारांना टोला मारला, अन् काही वेळातच डिलीट झाली..!

mahaanewslive by mahaanewslive
August 31, 2026
in यशोगाथा, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
शरद पवार ‘संस्थापक’ ठिक, पण ‘मालक’? उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत; चक्क शरद पवारांना टोला मारला, अन् काही वेळातच डिलीट झाली..!

सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांची बोचरी प्रतिक्रिया; काँग्रेसपासून टीडीपीपर्यंतच्या उदाहरणांचा दाखला

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेवरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये राजकीय वाकयुद्ध रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनी स्थापन केल्याचे वक्तव्य केल्यानंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलेली एक सोशल मीडिया पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. विशेष म्हणजे, ही पोस्ट नंतर डिलीट करण्यात आली.

सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उमेश पाटील यांनी थेट ‘संस्थापक’ आणि ‘मालक’ या दोन संकल्पनांमध्ये फरक असल्याचे अधोरेखित केले. ‘संस्थापक असणे आणि पक्षाचा तहहयात मालक असणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत,’ असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. त्यामुळे ही टिप्पणी थेट शरद पवारांना उद्देशून केलेला राजकीय टोला असल्याचा अर्थ राजकीय वर्तुळातून काढला जात आहे.

उमेश पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये राजकीय पक्षाची तुलना घर, जमीन, कंपनीतील शेअरहोल्डिंग किंवा वारसाहक्काने मिळणाऱ्या खासगी मालमत्तेशी करता येणार नसल्याचे म्हटले. पक्षाची घटना, सदस्य, संघटनात्मक रचना आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार राजकीय पक्ष चालतो, असा मुद्दा त्यांनी मांडला.
काँग्रेसपासून टीडीपीपर्यंत उदाहरणांचा दाखला

आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ पाटील यांनी काँग्रेस, भाजप, समाजवादी पक्ष, डीएमके, एआयएडीएमके आणि तेलुगू देसम पक्षाची उदाहरणे दिली. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष डब्ल्यू. सी. बॅनर्जी यांच्यापासून मल्लिकार्जुन खरगे यांच्यापर्यंतच्या नेतृत्वाचा, तर भाजपच्या अटलबिहारी वाजपेयींपासून नितीन नबीन यांच्यापर्यंतच्या अध्यक्षांचा त्यांनी उल्लेख केला.

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव असले तरी आज पक्षाचे नेतृत्व अखिलेश यादव करतात. डीएमकेचे संस्थापक अण्णादुराई यांच्यानंतर करुणानिधी आणि आता एम. के. स्टॅलिन यांच्याकडे नेतृत्व असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच एआयएडीएमकेचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन आणि टीडीपीचे संस्थापक एन. टी. रामाराव यांच्यानंतर त्या पक्षांचे नेतृत्व बदलल्याचा दाखला देण्यात आला.
‘संस्थापकत्व हा इतिहास आणि सन्मान आहे; तहहयात मालकीहक्क नाही,’ असा थेट संदेश या पोस्टमधून देण्यात आला होता.

‘शरद पवार संस्थापक आहेत, हे नाकारत नाही’
विशेष म्हणजे, उमेश पाटील यांनी शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असल्याचे स्पष्टपणे मान्य केले. ‘शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आहेत—हा इतिहास आम्ही नाकारत नाही,’ असे त्यांनी म्हटले. मात्र त्याचवेळी राजकीय पक्ष हा कोणत्याही एका व्यक्तीची कायमस्वरूपी खासगी मालमत्ता असू शकत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. पोस्टच्या शेवटी त्यांनी इंग्रजीतून ‘Founder is a matter of history. Leadership is a matter of organisation. Legal recognition is a matter of law.’ असा स्पष्ट राजकीय संदेश दिला.
अन् काही वेळातच पोस्ट गायब!

उमेश पाटील यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत येत असतानाच ती डिलीट करण्यात आली. पोस्ट नेमकी का हटवण्यात आली, याबाबत उमेश पाटील यांच्याकडून कोणते अधिकृत स्पष्टीकरण समोर आले आहे की नाही, याची स्पष्टता नसली तरी पोस्ट डिलीट झाल्याने राजकीय चर्चेला आणखी उधाण आले आहे.
सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना करण्यात आलेली ही पोस्ट म्हणजे शरद पवारांना दिलेला अप्रत्यक्ष नव्हे, तर बोचरा राजकीय टोला असल्याची चर्चा आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत सुरू झाली आहे.

एकीकडे शरद पवारांच्या संस्थापकत्वाचा सन्मान करण्याची भूमिका मांडायची आणि दुसरीकडे ‘मालकी हक्क’ मान्य नसल्याचा संदेश द्यायचा, अशी या पोस्टची राजकीय मांडणी होती. मात्र, सोशल मीडियावर राजकीय संदेश पोहोचण्यापूर्वीच पोस्ट हटवली गेल्याने ‘टोला मारला आणि पोस्ट मागे घेतली?’ अशी कुजबुजही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे पाटील यांची डिलीट केलेली पोस्ट आता राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षाच्या नव्या राजकीय चर्चेचा मुद्दा ठरत आहे.

Next Post
उमेश पाटलांना मेहबूब शेखांचं सणसणीत उत्तर! ‘पक्ष उभा करणाऱ्यालाच बेदखल करण्याचा नैतिक अधिकार कुणाला?’

उमेश पाटलांना मेहबूब शेखांचं सणसणीत उत्तर! ‘पक्ष उभा करणाऱ्यालाच बेदखल करण्याचा नैतिक अधिकार कुणाला?’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group