बारामती : महान्यूज लाईव्ह
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयात राजमाची, कराड.जि. सातारा. येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या कृषी महाविद्यालयातील मुलांच्या संघाने सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेत एकूण १० जिल्हातून ३७ मुलांचे संघ सहभागी झाले होते.
अंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेमध्ये बारामती कृषी महाविद्यालयातील यशस्वी संघामध्ये सौरभ कोळी, ओमप्रकाश साळुंखे, अथर्व साळुंखे, प्रतिक मोरे, नचिकेत काळे, निखिल कालेकर, अनिकेत आडके, ओमकार म्हेत्रे, विशाल पवार, आयुष टाव्हरे, ऋषिकेश निंभोरे, सिद्धेश पवार, अथर्व चौघुले, हर्षद चोपडे, ऋतिक जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश होता. श्री. दत्तात्रय आदलिंगे, रणजित देवकर या क्रीडा शिक्षकांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे, समन्वयक प्रशांत तनपुरे, उपप्राचार्य प्रा. एस. पी. गायकवाड, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्राचार्या जया तिवारी यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.











