इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर येथील वकील संघटनेचे मावळते अध्यक्ष ॲड एन. एस. शहा यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. माधव शितोळे देशमुख यांची निवड करण्यात आली.
ॲड. माधव शितोळे यांचा सत्कार मावळते अध्यक्ष ॲड.एन एस एस शहा यांनी केला. यावेळी ॲड. किरण धापटे. ॲड पांडूरंग जगताप, ॲड सचिन राऊत, ॲड. नितीन कदम, महिला प्रतिनिधी ॲड. जयश्री खबाले, ॲड. टी. बी. पाटिल, ॲड. हेमंत नरुटे, ॲड एन. जी. शहा, ॲड एम. एस. चौधरी, ॲड. के. डी. यादव यांनी मनोगत व्यक्त केले.
नूतन अध्यक्ष ॲड. माधव शितोळे यांनी सांगितले की, इंदापूर मध्ये सिनियर डिव्हीजन कोर्ट आणि सेशन कोर्ट आणण्यासाठी सर्व वकिल बांधवांच्या आणि कमिटीच्या सहकार्याने प्रयत्न करणार आहे. वरिष्ठ विधीज्ञांचे मार्गदर्शन घेऊन कोर्टातील न्यायाधीशांमार्फत आवश्यक तो पत्रव्यवहार केला जाईल.
या कार्यक्रमासाठी इंदापूर वकिल संघटनेचे सिनियर आणि ज्युनिअर वकिल व महिला भगिनी हजर होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ॲड. अशिफ बागवान व ॲड. अनिल पारेकर आणि आभार उपाध्यक्ष ॲड. धैर्यशील नलवडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड संकेत नगरे, ॲड. वैजनाथ गायकवाड, ॲड. विशाल राऊत यांनी सहकार्य केले.











