• Contact us
  • About us
Tuesday, September 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऊसतोड मजुरांच्या मदतीला धावले गावकरी ! फलटण तालुक्यातील बिबी गावाचे होतेय कौतुक !

Maha News Live by Maha News Live
December 5, 2021
in सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, कामगार जगत, राज्य, रोजगार, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

बिबी ग्रामस्थांची ऊसतोड मजुरांना मदत

फलटण : महान्युज लाईव्ह

शीतल अहिवळे

१ डिसेंबरच्या अवकाळी पावसाने राज्यभर दैना उडवली. यात फार मोठी परवड झाली ती ऊसतोड मजुरांची. त्यांचे तात्पुरते निवारे पावसाने झोडपून काढले. झोपड्यात शिरलेल्या पाण्यामुळे अन्नधान्य, कपडे यासह सर्व साहित्याचे मोठे नुकसान झाले. याचबरोबर पावसामुळे ऊसतोडही बंद पडल्याने आवकही बंद पडली.

अशा काळात संकटाग्रस्तांच्या मदतीला धावण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. या पंरपरेला साजेसे काम फलटणच्या बिबी गावाच्या ग्रामस्थांनी केले. त्यांनी दाखविलेल्या या माणुसकीचे राज्यभरातून कौतुक होत आहे.

बिबी गावाच्या परिसरात त्या रात्री शरयू, श्रीराम, माळेगाव, स्वराज या साखर कारखान्यांच्या टोळ्यांतून ३०० जण येथे वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. बीड, नगर, जामखेड परिसरातून आलेले हे सगळे लोक होते. अवकाळी पावसाने या सगळ्यांचीच दैना उडवली.

ही स्थिती बिबीच्या ग्रामस्थांना पाहवली नाही. सोशल मिडियातून मदतीसाठी आवाहन केले गेले. यातून रोख आणि वस्तूरुपाने मदत येऊ लागली. या मदतीतून या मजूर व त्यांच्या कुटुंबाची गावातील सरस्वती हायस्कूल, सांस्कृतिक हॉल, गावातील मंदिरे येथे राहण्याची व्यवस्था केली. त्यांची दोन दिवसाची जेवणाची व्यवस्था केली. दोन दिवसात मिळून ५५० जणांना ग्रामस्थांनी जेवण दिले. गावातील मुंबईत राहणाऱ्या लोकांनीही मदत पाठवली.

आता उर्वरित मदतीतून या कुटुंबांना किराणा किट देण्यासंदर्भात विचार सुरू आहे.

बिबी ग्रामस्थांनी ऐनवेळी केलेल्या मदतीबाबत ऊसतोड मजूरांनीही त्यांचे आभार मानले.

साखर कारखाने काय करताहेत

या ऊसतोड मजुरांच्या कष्टावर आपले कारखाने चालविणारे साखर कारखाने या संकटाच्या काळात मदतीसाठी का आले नाहीत असा प्रश्नही या निमित्ताने उभा राहतो आहे.

अवकाळी पाऊस आता दरवर्षीचाच झाला आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी येणाऱ्या या ऊसतोड मजुरांसाठी चांगले निवाऱ्याची सोय करणेही आता गरजेचे बनलेले आहे. यासाठी साखर कारखाने पुढाकार घेतील अशी अपेक्षा आहे.

Next Post

एक महिना दाढी व केसांवर खर्च करु नका ! " नो शेव्ह नोव्हेंबर " उपक्रमातून कॅन्सरग्रस्त युवकास मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group